Join us

गौतमी पाटीलचं मराठी कलाविश्वात पदार्पण; 'बिग बॉस'फेम 'या' अभिनेत्यासोबत करणार काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 17:34 IST

Gautami patil: गौतमीला एक नवा प्रोजेक्ट मिळाला असून नुकतीच त्याची घोषणा करण्यात आली आहे.

सोशल मीडिया सेन्सेशन आणि लावणी क्वीन असं बिरुद मिरवणारी गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. 'सबसे कातील गौतमी पाटील', असं म्हणत दिवसेंदिवस तिचा चाहतावर्ग वाढत आहे. विशेष म्हणजे तिच्या याच चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गौतमी लवकरच मराठी कलाविश्वात झळकणार आहे. गौतमीला एक नवा प्रोजेक्ट मिळाला असून नुकतीच त्याची घोषणा करण्यात आली आहे.

राज्यातील अनेक ठिकाणी स्टेज शो करुन प्रसिद्धी मिळवणारी गौतमी आता थेट मराठी कलाविश्वात झळकणार आहे. 'बिग बॉस'मराठी फेम उत्कर्ष शिंदे याच्यासोबत गौतमी काम करणार असून उत्कर्षने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याविषयीची माहिती दिली आहे. गौतमी लवकरच उत्कर्ष शिंदेच्या नव्या गाण्यात झळकणार आहे. यासाठी दोघांनीही हातमिळवणी केली असून उत्कर्षने याविषयी चाहत्यांना माहिती दिली आहे.

"अहो शेट लय दिसान झालीया भेट " ह्या माझ्या संगीतबद्ध केलेल्या सुपरहिट लावणी नंतर ह्यावर्षी लवकरच तुम्हा सर्वांसाठी .माझ नवं लिखाण नवं संगीत नव्या गायकेसोबत खूप साऱ्या नवीन लावण्या घेऊन येणार .लवकरच , असं कॅप्शन देत उत्कर्षने ही माहिती दिली आहे.

दरम्यान, या पोस्टमध्ये उत्कर्षसोबत गौतमीदेखील दिसून येत आहे. त्यामुळे आता चाहत्यांचं लक्ष उत्कर्ष आणि गौतमीच्या नव्या गाण्याकडे वेधलं गेलं आहे.  विशेष म्हणजे गौतमीचं आता हळूहळू मराठी सिनेविश्वात पदार्पण होत असल्याचं पाहून तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळेच अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

टॅग्स :गौतमी पाटीलबिग बॉस मराठीसेलिब्रिटी