Join us
Daily Top 2Weekly Top 5

गौतमीची लावणी कला नव्हे, उथळपणा : प्रिया बेर्डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 06:42 IST

‘लावणी हा सुंदर कलाप्रकार असला तरी गौतमी पाटीलसारख्या कलाकारांच्या लावणीला कला म्हणताच येणार नाही.

सांगली :

‘लावणी हा सुंदर कलाप्रकार असला तरी गौतमी पाटीलसारख्या कलाकारांच्या लावणीला कला म्हणताच येणार नाही. रसिकांनी अशा उथळपणाकडे दुर्लक्ष करायला हवे’, असे मत भाजपच्या सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा प्रिया बेर्डे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

बेर्डे म्हणाल्या, ‘गौतमी पाटील यांच्यासारख्या कलाकारांना अकारण मोठे केले जात आहे. रसिक जोपर्यंत असे प्रकार दुर्लक्षित करणार नाहीत, तोपर्यंत हे प्रकार सुरूच राहतील. कलेच्या नावावर काहीही खपविण्यात येते. पारंपरिक लावणी व नृत्य अत्यंत सुंदर आहे. त्यातील अस्सलपणा हरविला जाऊ नये, तो टिकून राहावा यासाठी रसिकांनीच प्रयत्न केले पाहिजे.’

कलाकारांना बळ देणे, त्यांचे मानधन  वाढविणे यासाठी प्रयत्न राहतील’, असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :गौतमी पाटीलप्रिया बेर्डे