स्वप्नापलीकडे या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वैदेही म्हणजेच गौरी नलावडे ही एकदम हटके अंदाजात तिच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. हा तिचा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी ती स्वप्निल जोशी व सचित पाटील यांच्यासोबत फ्रेंड्स या चित्रपटात दिसली होती. यानंतर गौरी नक्की काय करते हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक होते. पण आता, तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गौरी ही लवकरच एकदम हटके अंदाजात एका चित्रपटात झळकणार आहे. याविषयी लोकमत सीएनएक्सशी बोलताना गौरी म्हणाली, ‘हो, मी लवकरच एका हटके अंदाजात चित्रपटात पाहायला मिळेल. या चित्रपटातील माझी भूमिका खूप वेगळ्या स्वरूपाची आहे. मी आजपर्यंत कधीही अशी भूमिका साकारलेली नाही. तसेच अशा प्रकारचा चित्रपट करायचा मी कधी विचारदेखील केला नव्हता. या चित्रपटात वेगळी गौरी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाबद्दल सध्या मी खूप काही सांगू शकणार नाही. पण एवढेच म्हणेन की, हा चित्रपट अतिशय इंटरेस्टिंग आहे. या चित्रपटात माझ्यासोबत मराठी इंडस्ट्रीतील दोन नावाजलेले कलाकार पाहायला मिळतील. पण या चित्रपटाचे नाव अजून गुलदस्त्यातच आहे. यासाठी प्रेक्षकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. चला तर पाहूयात, गौरी नक्की प्रेक्षकांना तिच्या वेगळ्या अदांजात कोणता धक्का देणार आहे.
गौरी नलावडे हटके अंदाजात तिच्या आगामी चित्रपटात झळकणार
By admin | Updated: August 3, 2016 02:27 IST