शाहरुख खानची पत्नी गौरी खान अभिनेत्री नसली, तरी तिची लोकप्रियता एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. त्यामुळेच अनेक सार्वजनिक कार्यक्रमांत आणि जाहिरातींमध्ये ती दिसत असते. नुकतेच एका मोठय़ा कन्स्ट्रक्शन कंपनीने गौरी खानला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. विशेष म्हणजे या कंपनीने गौरीआधी शिल्पा शेट्टीशी संपर्क केला होता. शिल्पानेही या जाहिरातीला होकार दिला होता आणि एका फोटोशूटची योजनाही बनविण्यात आली होती; पण ऐनवेळी कंपनीने शिल्पाऐवजी गौरीची निवड केली. गौरी स्वत: एक इंटेरिअर डिझायनर आहे. सूत्रंच्या मते, कंपनीला एक असा चेहरा हवा जो लोकांना आपलासा वाटेल. हा चेहरा कौटुंबिक आदर्श असावा, अशी त्यांची इच्छा होती. शिल्पा शेट्टी आणि गौरी खान, असे दोन पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध होते. त्यापैकी गौरीने ही बाजी जिंकली आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}