Join us

गौरव घाटणेकर रेडिओ जॉकीच्या भूमिकेत

By admin | Updated: February 18, 2017 05:21 IST

गौरव घाटणेकर रेडिओ नाइट्स या चित्रपटात रेडिओ जॉकीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. रेडिओ जॉकीची भूमिका तो त्याच्या

गौरव घाटणेकर रेडिओ नाइट्स या चित्रपटात रेडिओ जॉकीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. रेडिओ जॉकीची भूमिका तो त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच साकारणार आहे. हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रिलर असून, या चित्रपटात एका रेडिओ जॉकीच्या आयुष्यात घडलेली गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रात्रभर चालणाऱ्या एका रेडिओच्या कार्यक्रमात रेडिओ जॉकीला एक निनावी मुलीचा फोन येतो आणि ती संकटात सापडली असल्याचे त्याला सांगते. पण, त्या मुलीचे  सात वर्षांपूर्वीच निधन झाले असल्याचे त्या रेडिओ जॉकीला कळते. त्यामुळे तो फोन कसा आला, तो कोणी केला आणि त्यानंतर पुढे काय झाले अशी या चित्रपटाची रहस्यमय कथा आहे. या चित्रपटात गौरवसोबत कादंबरी कदमदेखील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.