देशप्रेमाने ओतप्रोत असलेला आणि कोकणभूमिच्या सौंदर्याची पखरण करणारा ‘विटी दांडू’ सिनेमा येत्या 21 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. अभिनेता अजय देवगण प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या या सिनेमातून स्वातंत्र्य पूर्व काळातील कोकण आणि स्वातंत्र्य लढय़ाची पाश्र्वभूमी आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन गणोश कदम यांचे असून कथा व पटकथा विकास कदम यांचे आहे. विकासची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर व विकास कदम हे ‘नारबाची वाडी’नंतर पुन्हा एकत्र दिसणार आहेत. स्वातंत्र्योत्तर व स्वातंत्र्यपूर्व काळाची सफर घडविणा:या या चित्रपटातून आज आपण उपभोगत असलेले स्वातंत्र्य मिळविण्यासाठी पूर्वजांनी दिलेल्या बलिदानाची कथा आहे. गोविंद नावाच्या लहान मुलाची त्याच्या आजोबांची ही कथा आहे. दिलीप प्रभावळकर, यतिन कार्येकर, अशोक समर्थ, रवींद्र मंकणी, निशांत भावसार, विकास कदम, शुभंकर अत्रे, राधिका देवरे व मृणाल ठाकूर यांच्या यात
भूमिका आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}