Join us
Daily Top 2Weekly Top 5

गजेंद्र अहिरे घेऊन येत आहेत ‘शासन’

By admin | Updated: September 24, 2015 00:29 IST

‘बायोस्कोप’आणि ‘निळकंठ मास्तर’ च्या यशस्विततेनंतर दिग्दर्शक गजेंद्र अहिरे घेऊन येत आहेत ‘शासन’

‘बायोस्कोप’आणि ‘निळकंठ मास्तर’ च्या यशस्विततेनंतर दिग्दर्शक गजेंद्र अहिरे घेऊन येत आहेत ‘शासन’ हा मल्टिस्टार पॉलिटिकल ड्रामा असलेल्या या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच कलाकारांची भाऊगर्दी पहायला मिळणार आहे. त्यात डॉ. श्रीराम लागू, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, जितेंद्र जोशी, मनवा नाईक, सिद्धार्थ जाधव, वृंदा गजेंद्र, विक्रम गोखले, मोहन जोशी यांचा समावेश आहे. राजकारण हा एक खेळ असून, प्रत्येकजण त्यात सहभागी झालेला आहे. राजकारणामध्ये वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी एक तरुण युनियन लीडर कशा पद्धतीने परिस्थितीचा स्वत:च्या फायद्यासाठी उपयोग करून घेतो, याची ही कहाणी आहे.