Join us
Daily Top 2Weekly Top 5

तर असं होणार राज कुंद्राचं स्वागत... ! नेटकऱ्यांनी घेतली मजा, सोशल मीडियावर मीम्सचा पूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 12:31 IST

Raj Kundra bail : राजला जामीन मिळाल्याची बातमी कळताच, सोशल मीडियावर मीम्सचा जणू पूर आला आहे.

ठळक मुद्देराजला जामीन मिळाल्यानंतर शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर एक सूचक पोस्ट शेअर केली आहे. शिल्पाने आकाशातील इंद्रधनुष्याचा फोटो पोस्ट केला आहे. ‘मोठ्या वादळानंतरही चांगल्या गोष्टी घडतात,’ असं हा फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे.

शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty ) पती राज कुंद्राला (Raj Kundra)अखेर जामीन मंजूर झाला. पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा गेल्या दोन महिन्यांपासून तुरूंगात होता. गेल्या 19 जुलैला मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती. 62 दिवसानंतर राज आज तुरूंगातून बाहेर येणार म्हटल्यावर साहजिकच शिल्पा खुश्श असणार. राजना पाहून ती कशी रिअ‍ॅक्ट करणार, हे तूर्तास तरी माहित नाही. पण सोशल मीडियावर नेटक-यांनी मात्र याचा अंदाज आधीच लावला आहे. राजला जामीन मिळाल्याची बातमी कळताच, सोशल मीडियावर मीम्सचा जणू पूर आला आहे.

 ट्विटर आणि इन्स्टावर नेटक-यांनी एकापेक्षा एक भन्नाट फनी पोस्ट केल्या आहेत. तुरूंगातून बाहेर आलेल्या राजचे शिल्पा कसे स्वागत करणार? हे या मीम्समधून सांगण्याचा प्रयत्न नेटक-यांनी केला आहे. अनेक मीम्समध्ये नेटक-यांनी शिल्पा व राजची खिल्ली उडवी आहे. एका मीममध्ये शिल्पा शेट्टी लाटणं घेऊन उभी आहे.   तेव्हा पाहुयात यावरचे भन्नाट मीम्स...

शिल्पाची पोस्टराजला जामीन मिळाल्यानंतर शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर एक सूचक पोस्ट शेअर केली आहे. शिल्पाने आकाशातील इंद्रधनुष्याचा फोटो पोस्ट केला आहे. ‘मोठ्या वादळानंतरही चांगल्या गोष्टी घडतात,’ असं हा फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे.मुंबई उच्च न्यायालयाकडून सोमवारी राज कुंद्राला जामीन मंजूर करण्यात आला. अश्लील व्हिडीओ प्रकरणी 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. 19 जुलै रोजी कुंद्राला रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आलं होतं.   सदर प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलनं 1500 पानांची सप्लीमेंट्री चार्जशीट दाखल करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार या चार्जशीटमध्ये 43 जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. 

टॅग्स :शिल्पा शेट्टीराज कुंद्रा