Join us  

जबरदस्त डायलॉग, मनोरंजन आणि कॉमेडीचा तडका, 'फुकरे 3' चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2023 7:11 PM

'फुकरे 3' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.  

बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, जे प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. प्रेक्षकांना खळखळून हसवणारा फुकरे हा चित्रपटही याच यादीत आहे.   आता त्याचा तिसरा भाग २८ सप्टेंबरला थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतेच,  'फुकरे 3' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.  

2 मिनिटे आणि 51 सेकंदाच्या ट्रेलरनेच चाहत्यांना खूश केले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच जबरदस्त डायलॉग, मनोरंजन आणि कॉमेडी पाहायला मिळत आहे. रिचा चढ्ढा, पंकज त्रिपाठी, पुलकित सम्राट, यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटामध्ये आहेत. 

'फुकरे 3' मनोरंजनाचा डबलडोस असणार आहे.  कारण यावेळीही पंकज त्रिपाठीही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ज्यांच्या कॉमिक टायमिंगचे चाहत्यांनी कायमच कौतुक केले आहे. 

फुकरे  हा 2013 मध्ये रिलीज झाला. त्यानंतर 2017 मध्ये फुकरे रिटर्न्स रिलीज झाला. आता 5 वर्षांनंतर त्याचा तिसरा भाग प्रदर्शित होत आहे.  अली फजल मात्र या भागात दिसणार नाही.  

टॅग्स :बॉलिवूडसिनेमारिचा चड्डापंकज त्रिपाठी