Join us

Friends दाखवणार मैत्रीचे नवे अड्डे

By admin | Updated: January 14, 2016 02:43 IST

मैत्री या शब्दाची व्याख्या कधीही न बदलणारी पण प्रत्येकाची मैत्री वेगळंच काहीतरी सांगणारी. मग ही मैत्री ५ मित्र-मैत्रिणींमधील असो वा दोन मित्र किंवा मैत्रिणींमधील. ते नातेच वेगळे असते. पण हां...

मैत्री या शब्दाची व्याख्या कधीही न बदलणारी पण प्रत्येकाची मैत्री वेगळंच काहीतरी सांगणारी. मग ही मैत्री ५ मित्र-मैत्रिणींमधील असो वा दोन मित्र किंवा मैत्रिणींमधील. ते नातेच वेगळे असते. पण हां... या मैत्रीच्या गप्पा मारण्याच्या, टाईमपास-मस्ती करण्याच्या किंवा एकमेकांशी दु:ख शेअर करण्याच्या जागा आता निश्चितच बदलल्या आहेत. पूर्वी कॉलेजमध्ये मित्रांच्या गप्पांचे अड्डे जमायचे, किंवा हॉस्टेल जवळच्या टपरीवर गप्पांचे कट्टे रंगायचे. काहीही झालं तरी मोबाईल, कॉम्पुटर, इंटरनेट नसल्यामुळे प्रत्यक्ष समोरासमोर आल्याशिवाय भेट होत नसे. पण काळ बदलतो तशी प्रत्येकच गोष्ट बदलत जाते. तसेच मैत्रीचे हे अड्डेदेखील आता बदलले आहेत. सोशल साईट्स सारख्या सोयीसुविधांमुळे आज भेटलेच पाहिजे अशी अट राहिलेली नाही.अर्थातच हे दोन वेगळ्या देशांत राहणाऱ्या मित्रांना किंवा मैत्रिणींना जवळ आणायचे काम या इंटरनेट कट्ट्यांनी केले आहे. म्हणजे काय, तर व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, जी-मेल, हाईक असे नाना प्रकारचे मैत्रीचे कट्टे आज उपलब्ध झाले आहेत. आणि मैत्री या विषयावर येत असलेल्या ‘Friends’ या चित्रपटाच्या नावातही नेमक्या याच सोशल साईट्सच्या चिन्हांचा वापर करण्यात आला आहे. थोडक्यात काय, तर कट्टा, अड्डे बदलले तरी तिथली मैत्री बदलत नाही असाच मेसेज या चित्रपटातून द्यायचा आहे. या चित्रपटात स्वप्निल जोशी, सचित पाटील, गौरी नलावडे, नेहा महाजन आदी कलाकार मुख्य भूमिका साकारत आहेत.