सलमान खानच्या चाहत्यांना ही बातमी निराश करू शकते. सलमानच्याही मते त्याला सध्या शॉर्ट टर्म मेमरी लॉस झाला आहे. सध्या सूरज बडजात्यांच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चे शूटिंग करीत असलेला सलमान वारंवार त्याचे डायलॉग विसरत आहे. सलमानच्या तोंडून आजवर एकाहून एक सरस डायलॉग आपण ऐकले आहेत; पण तो असाच संवाद विसरत राहिला, तर त्याचा परिणाम अभिनयावरही होण्याची शक्यता आहे. सलमानच्या वाटेला साधारण संवाद यावेत याची काळजी दिग्दर्शक घेत आहेत, त्याने संवाद लेखकालाही तसा सल्ला दिला आहे.
विसरभोळा सलमान
By admin | Updated: December 24, 2014 04:30 IST