Join us

प्रिया प्रकाशनंतर 'या' अभिनेत्रीच्या आँखमिचोलीने सोशल मीडिया 'खल्लास'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 17:07 IST

आता आणखी एक व्हिडीओ सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. आता भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबेने इंटरनेटवर धमाका उडवून दिलाय.  

प्रिया वॉरियरने देशातील करोंडो प्रेक्षकांना आपल्या नजरेच्या इशा-याने घायाळ केल्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. आता भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबेने इंटरनेटवर धमाका उडवून दिलाय.  

प्रिया प्रकाश प्रमाणेच आम्रपालीच्या अदाही प्रेक्षकांचं काळीज घायाळ करत आहे. ही क्लिप आम्रपालीच्या राजा बाबू या सिनेमातील गाजलेल्या गाण्यातील आहे. 2015 मध्ये हा सिनेमा आला होता. 

आता आम्रपालीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या गाण्यात आम्रपालीसोबत भोजपुरी सिनेमातील स्टार निरहुआ दिनेश लाल यादव दिसला होता. आम्रपालीचा हा व्हिडीओ सध्या गाजत असला तरी प्रियाच्या व्हिडीओ इतकी लोकप्रियता मिळत नाहीये. पण काहींच्या हा व्हिडीओ पसंतीस उतरत आहे.