Join us

एकाच चित्रपटात पाच नवे चेहरे!

By admin | Updated: May 12, 2015 23:18 IST

दिग्दर्शक केदार शिंदे नवीन कलाकारांना ब्रेक देण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहेत. यासाठी काही लोक गमतीत त्यांना मराठीतील सलमान खानही

दिग्दर्शक केदार शिंदे नवीन कलाकारांना ब्रेक देण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहेत. यासाठी काही लोक गमतीत त्यांना मराठीतील सलमान खानही म्हणतात. त्यांच्या २२ मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ‘अगं बाई अरेच्चा २’ या सिनेमात १ नाही, २ नाही तर तब्बल ५ कलाकारांना महत्त्वांच्या भूमिकांसाठी ब्रेक दिला आहे. यात निषाद या नवा दमाच्या संगीतकाराचे संगीत असून, कलाकारांमध्ये धरम गोहील, शिवराज वायचळ, गौरवी जोशी व सध्या मराठी मालिकेत म्हाळसा म्हणून रसिकांच्या परिचयास आलेली सुरभी हांडे यांचा समावेश आहे.