‘सुपरनानी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणा:या अभिनेत्री रेखा यांनी त्यांच्या ‘फितूर’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. ‘फितूर’मध्ये प्रेक्षकांना त्यांचा ‘उमराव जान’ लूक पुन्हा पाहायला मिळणार आहे. सध्या काश्मीरमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. रेखाच्या शूटिंगचे काही फोटो लीक झाले आहेत. या फोटोंमध्ये रेखाची ‘उमराव जान’सारखी नजाकत आणि अदा पाहायला मिळतेय. ‘फितूर’चे दिग्दर्शन अभिषेक कपूर करीत आहेत. ‘फितूर’मध्ये रेखासोबत पहिल्यांदाच कॅटरिना कैफ आणि आदित्य कपूर अभिनय करणार आहेत. रेखा या चित्रपटात अमीर बेगमच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट चाल्र्स डिकन्स यांच्या ‘द ग्रेट एक्स्पेक्टेशन्स’ या पुस्तकावर आधारित आहे.