Join us
Daily Top 2Weekly Top 5

फितूर, अजहर मध्येही लारा

By admin | Updated: October 12, 2015 04:20 IST

अ नेक चित्रपटात दर्जेदार अभिनय करणाऱ्या लारा दत्ताने मुलगी ‘सायरा’च्या जन्मानंतर काही काळाचा ब्रेक घेतला होता. यानंतर ‘सिंग इज ब्लिंग’ द्वारे तिने दमदार पुनरागमन केले.

अ नेक चित्रपटात दर्जेदार अभिनय करणाऱ्या लारा दत्ताने मुलगी ‘सायरा’च्या जन्मानंतर काही काळाचा ब्रेक घेतला होता. यानंतर ‘सिंग इज ब्लिंग’ द्वारे तिने दमदार पुनरागमन केले. सध्या तिच्या हातात ‘फितूर’ , ‘अजहर’ आणि अजुनही बरेच चित्रपट आहे. चार्ल्स डिके न्स यांच्या ‘ग्रेट एक्सपेक्टेशन्स’ या कादंबरीवर आधारीत अभिषेक कपूरच्या ‘फितूर’ मध्ये कॅ टरीना कैफ आणि आदित्य राय कपूर यांच्या मुख्य भूमिका असून लारा लहान परंतू महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. याबाबत बोलताना लारा म्हणाली की ‘या चित्रपटात मी एका सुंदर, सुशील आणि बुद्धीमान महिलेचे पात्र साकारणार आहे तर ‘अजहर’ मध्ये मी वकील महिलेच्या भूमिकेत आहे.नव्या पिढीसोबत काम करायला मिळत असल्यामुळे आनंदात आहे.’ बदलत्या भारतीय सिनेमाबाबत बोलताना लारा म्हणाली ‘चित्रपटांमध्ये सातत्याने प्रयोग होत आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे. अभिनेत्रींसाठी पण दमदार भूमिकांची निर्मिती होत आहे, ही चांगली गोष्ट आहे.’