Join us
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानच्या 'भारत' सिनेमाच्या सेटवरील पहिला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 13:16 IST

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या आगामी 'भारत' या सिनेमाची शूटिंग सुरु झाली आहे. या सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या शूटिंगचा फोटो समोर आलाय. 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या आगामी 'भारत' या सिनेमाची शूटिंग सुरु झाली आहे. या सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या शूटिंगचा फोटो समोर आलाय. 

दिग्दर्शक अली अब्बास जफरने त्यांच्या ट्विटर हॅंडलवर सिनेमाच्या सेटवरील फोटो शेअर केलाय. या फोटोत सलमान खान हा क्लीप बोर्डच्या मागे उभा दिसत आहे. पण यात त्याचा चेहरा पूर्णपणे दिसत नाहीये. हा सलमानचा हा सिनेमा ईद 2019 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा सिनेमा 2014 मध्ये आलेल्या दक्षिण कोरियाई 'ऑडी टु माय फादर' या सिनेमावर प्रेरित असल्याची माहिती आहे.

सलमान खानने नुकतीच त्याच्या 'रेस 3' सिनेमाची शूटिंग पूर्ण केली आहे. जूनमध्ये रिलीज होणा-या 'रेस 3' मध्ये जॅकलिन फर्नांडिस, डेझी शाह, बॉबी देओल आणि अनिल कपूर दिसणार आहेत. 

टॅग्स :बॉलिवूडसलमान खान