ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - गौरी शिंदेच्या 'इंग्लिश विग्लिंश' सिनेमातून इंडस्ट्रीमध्ये दमदार पर्दापण करणारी बॉलिवूडची मिस हवा-हवाई श्रीदेवीचा आगामी सिनेमा 'मॉम'चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात श्रीदेवी पुन्हा एकदा 'आई'च्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा फर्स्ट लूक असलेला पोस्टर श्रीदेवीनं सोशल मीडियावर ट्विटरवर शेअर केला आहे. या पोस्टरवर वेगवेगळ्या भाषांमध्ये 'मां' असे लिहिलेलं दिसत आहे.
या सिनेमाचे दिग्दर्शन रवी उद्यावर यांनी केलं असून सिनेमाचे निर्माते बोनी कपूर आहेत. या सिनेमात अक्षय खन्ना, अभिमन्यू सिंह यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर सिनेमामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे.
याव्यतिरिक्त सिनेमामध्ये दोन पाकिस्तानी कलाकारांचाही समावेश आहेत. अदनान सिद्दीकी आणि सजल अली अशी या पाकिस्तानी कलाकारांची नावं आहेत.
दरम्यान, हा सिनेमा हिंदी भाषेसोबत तामिळ आणि तेलुगु भाषांमध्ये 14 जुलैला बॉक्सऑफिसवर रिलीज करण्यात येणार आहे.
When a woman is challenged... Here's presenting the first look of MOM. #MOMFirstLookpic.twitter.com/taaJBeDH1d— SRIDEVI BONEY KAPOOR (@SrideviBKapoor) March 14, 2017