Join us

सिद्धार्थ आणि कतरिनाचा 'बार बार देखो'मधील फर्स्ट लूक रिलीज

By admin | Updated: April 21, 2016 15:19 IST

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफच्या आगामी चित्रपट 'बार बार देखो'चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे

शिवराज यादव - 
मुंबई, दि. २१ - अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफच्या आगामी चित्रपट 'बार बार देखो'चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने ट्विटर अकाऊंटवरुन फोटो शेअर केले आहेत. करण जोहर या चित्रपटाचा सह-निर्माता आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नित्या मेहराने केलं आहे. नित्या मेहराचा हा पहिलाच चित्रपट आहे. 
 
'या चित्रपटात प्रेमी जोडप्याचा 40 वर्षांचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. ही एक काल्पनिक कथा असून एका व्यक्तीच्या आयुष्यातील 18 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे', अशी माहिती चित्रपटात प्रमुख्य व्यक्तीरेखा साकारणा-या अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने मुलाखतीदरम्यान दिली आहे. सिद्धार्थ मल्होत्राचा 'कपूर अॅण्ड सन्स' शेवटचा चित्रपट आला होता. तर कतरिना कैफ 'फितूर ' चित्रपटात शेवटची दिसली होती. सध्या ती रणबीर कपूरसोबत 'जग्गा जासूस' चित्रपटाचं शूटिंगदेखील करत आहे.