Join us
Daily Top 2Weekly Top 5

सैफ-करीनाचा मुलगा तैमूरची पहिली झलक

By admin | Updated: February 14, 2017 08:54 IST

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि त्याची पत्नी करीना कपूर यांनी मुलगा तैमूर अली खानचा पहिलावहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 14 - बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि त्याची पत्नी करीना कपूर यांनी मुलगा तैमूर अली खानचा पहिलावहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडियावर तैमूरचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सर्वजण तैमूरचे तोंडभरुन कौतुक करताना दिसत आहेत. 
 
तैमूरची स्तुती करताना प्रियंकाने म्हटले आहे की, त्याचे ओठ अगदी करीना कपूरप्रमाणे आहेत. यावर 'माझा मुलगा जगातील सर्वात गोड बाळ आहे', असा रिप्लाय करीनाने प्रियंकाला दिला. तैमूरचा जन्म 20 डिसेंबर 2016  मध्ये झाला. जन्मानंतर त्याच्या नावावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वादंग निर्माण झाले होते. काही जणांनी तैमूर नावाचे समर्थन केले होते, तर काहींनी विरोध करत करीना आणि सैफला टार्गेट केले.  
 
काही दिवसांपूर्वी स्वतः करीनाने एका मुलाखतीत म्हटले होते की, 'मला समजलं नाही लोकांना माझ्या मुलाच्या नावासोबत काय घेणेदेणे आहे. मी आणि सैफने विचारपूर्वक आमच्या बाळाचे नाव ठेवले आहे. या नावावरुन दुस-या कोणाला काय समस्या असू शकते'.  दरम्यान, करीनाने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर आता पुन्हा एकदा तैमूरचे नाव हॅशसहीत #TaimurAliKhan  ट्रेंडमध्ये आले आहे.