Join us

शाहिद मीराच्या गोंडस मीशाची पहिली झलक

By admin | Updated: February 8, 2017 15:18 IST

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूरने आपली मुलगी मीशाचा पहिलावहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 8 - बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूरने आपली मुलगी मीशाचा पहिलावहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यावर 'So Cute' (सो क्युट) हे शब्द आपसुकच कोणच्याही तोंडून बाहेर येतील, इतकी मीशा या फोटोत गोड दिसते आहे. 
 
'हॅलो वर्ल्ड' असे या फोटोचे कॅप्शन असून शाहिदने पत्नी मीरासोबत मीशाचा गोड फोटो सर्वांसोबत शेअर केला आहे. याआधी 6 फेब्रुवारीला शाहिदने मीशासोबतचा सनसेट शॅडोमधील खूपच सुंदर आणि गोंडस फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला होता.
काही दिवसांपूर्वी शाहिदने मिशाचा फोटो लवकरच शेअर करणार असल्याचे एका कार्यक्रमादरम्यान म्हटले होते.
 
मीशा लहान असल्याने फोटोग्राफरला तिचा फोटो काढू देणे थोडा विचित्र प्रकार आहे. यासाठी मी स्वतःच तिचा फोटो शेअर करेन. सर्वांसोबत मीशाचा फोटो शेअर करताना आम्हालाही खूप आनंद होईल, असे शाहिदने म्हटले होते.  त्यानुसार शाहिदने बुधवारी मीशाची पहिली झलक त्याच्या चाहत्यांना दाखवली.