Join us
Daily Top 2Weekly Top 5

राहुल वैद्य-दिशाच्या लेकीची पहिली झलक समोर, लक्ष्मीच्या आगमनाने कुटुंबात आनंदाचं वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 08:39 IST

राहुलची बहीण श्रुती वैद्यने या घरी आलेल्या चिमुकलीचा पहिला फोटो शेअर केला आहे.

गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि पत्नी दिशा परमार (Disha Parmar) नुकतेच आईबाबा झाले आहेत. चार दिवसांपूर्वीच दिशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आणि कुटुंबात लक्ष्मीचं आगमन झालं. राहुलने तर बिग बॉसच्या घरात असतानाच मला पहिली मुलगीच हवी ही इच्छा व्यक्त केली होती. त्याची इच्छा खरोखर पूर्ण झाली. राहुलची बहीण श्रुती वैद्यने या घरी आलेल्या चिमुकलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. दोन्ही कुटुंबीयांनी घरात आलेल्या नव्या सदस्याभोवती गोतावळा केलेला आहे.

श्रुती वैद्यने एक छानसा फोटो शेअर केला आहे. यामध्ये राहुलचे बाबा नातीला आशिर्वाद देताना दिसत आहेत. तर राहुलची आई आणि बहीण प्रेमाने नातीकडे बघत आहेत. राहुल जेव्हा लेकीला घरी घेऊन आला तो दिवस त्याच्यासाठी खास होता कारण त्याच दिवशी त्याचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवशीच दिशाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.राहुल सध्या आपल्या कुटुंबियांसोबत हे सर्व क्षण एन्जॉय करत आहे. 

राहुल आणि दिशाची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. दोघंही 'जब वे याद तेरी गाने' च्या सेटवर पहिल्यांदा भेटले. त्यांच्यात लगेच मैत्री झाली. काही काळाने मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. राहुल बिग बॉस 14 मध्ये असताना त्याने नॅशनल टेलिव्हिजनवर दिशाचं नाव घेत तिला प्रपोज केलं होतं. राहुल बाहेर आल्यानंतर दोघांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली आणि ते लग्नबंधनात अडकले. लेकीच्या जन्मानंतर त्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. 

टॅग्स :राहुल वैद्यपरिवारसोशल मीडिया