Join us

Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार, दहशतवादी हरजीत सिंग लड्डीनं घेतली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 09:26 IST

Kapil Sharma Cafe Firing: अलीकडेच कपिल शर्माने कॅनडामध्ये कॅफे सुरू केला आणि अवघ्या एका आठवड्यात त्याच्यावर गोळीबार झाला होता, ज्याची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने घेतली आहे.

Kaps Cafe Attack: कपिल शर्मा (Kapil Sharma) हे विनोदी विश्वातील एक लोकप्रिय नाव आहे. त्याने अभिनय आणि गायनात करिअर केले आहे आणि आता तो व्यवसायातही नशीब आजमावतोय. अलीकडेच त्याने कॅनडामध्ये स्वतःचा कॅफे उघडला आहे. जो काही दिवसांतच अपघाताचा बळी ठरला आहे. खरंतर, कपिलच्या कॅप्स कॅफे (Kaps Cafe) सुरू झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात गोळीबार झाला होता, ज्याची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने घेतली आहे.

कपिल शर्माचा कॅप्स कॅफे बऱ्याच काळापासून चर्चेत आहे, त्याने आणि त्याची पत्नी गिन्नीने कॅफेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. परंतु, कॅफेमध्ये गोळीबाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून, या घटनेने सर्वांना हादरवून सोडले आहे. मात्र, या गोळीबारात कोणत्याही व्यक्तीला दुखापत झालेली नाही. खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे आणि कपिलला आणखी वाईट परिणामांची धमकीही दिली आहे.

लड्डीवर १० लाख रुपयांचं बक्षीसहरजीत सिंग लड्डीबद्दल बोलायचे झाले तर, तो पंजाबमधील नवांशहरचा रहिवासी आहे, जो खूप दिवसांपूर्वी देश सोडून गेला आहे. हरजीत बब्बर खालसा इंटरनॅशनलसाठी काम करतो. तो कॅनडामध्ये राहून भारतातील दहशतवादी कारवायांवरही लक्ष ठेवतो. हरजीत हा भारताच्या एनआयएचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. २ वर्षांपूर्वी एनआयएने त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीसही ठेवले होते. असे सांगितले जात आहे की त्याने कपिल शर्माला भविष्यात वाईट परिणाम होईल, अशी धमकी देखील दिली आहे.

गोळीबार का करण्यात आला?हरजीत सिंगने दावा केला आहे की, कपिलने काही काळापूर्वी निहंग शिखांच्या पोशाखाची खिल्ली उडवली होती. या विनोदामुळे हरजीत सिंग खूप संतापला होता, ज्यासाठी त्याने कपिल शर्माच्या मॅनेजरशी बोलण्याचा प्रयत्नही केला, परंतु मॅनेजरकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्याने कपिलच्या कॅफेमध्ये गोळीबार केला. गोळीबारानंतर हरजीत म्हणतो की जर कपिलने त्याच्या विनोदाबद्दल माफी मागितली नाही तर भविष्यात आणखी वाईट परिणाम होतील.

टॅग्स :कपिल शर्मा कॅनडागोळीबारटिव्ही कलाकार