Join us
Daily Top 2Weekly Top 5

अखेर प्रियांका ‘डॉन ३’वर बोलली

By admin | Updated: June 29, 2016 00:39 IST

‘डॉ न ३’ची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, पण अलीकडे या तिसऱ्या भागात मुख्य नायिका कोण असणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे

‘डॉ न ३’ची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे, पण अलीकडे या तिसऱ्या भागात मुख्य नायिका कोण असणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. डॉन सीरिजची महत्त्वाची भाग राहिलेली ही ‘जंगली बिल्ली’ शाहरूखला आता नकोय, असेदेखील बोलले जातेय. तिच्या जागी जॅकलीनला कास्ट करण्याचीही बातमी आली. प्रियांकाला याबद्दल विचारले असताना, तिने अखेर खुलासा केला की, माझ्या माहितीनुसार ‘डॉन ३’ चित्रपटावर अद्याप कसल्याही प्रकारचे काम सुरू झालेले नाही. या सर्व अफवा आहेत. त्यामुळे मी असणार की नाही, हा नंतर मुद्दा आहे. आधी चित्रपटच बनवायचा की नाही, हे निश्चित होऊ द्या. आता ‘देसी गर्ल’च्या या वक्तव्यामुळे या चित्रपटाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांचा हिरमोड झाला असणार. स्पेनहून ‘आयफा’ सोहळ्यानंतर ती सध्या सुट्ट्या घालविण्यासाठी मुंबईत आलेली आहे.