Join us

चित्रपट निर्माते करीम मोरानींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2017 08:26 IST

हॅपी न्यू ईयर, चेन्नई एक्स्प्रेस अशा हिट चित्रपटांची निर्मिती करणारे प्रसिद्ध चित्रपट निर्माते करीम मोरानी यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत

हैदराबाद, दि. १९ - हॅपी न्यू ईयर, चेन्नई एक्स्प्रेस, रा.वन, अशा हिट चित्रपटांची निर्मिती करणारे प्रसिद्ध चित्रपट निर्माते करीम मोरानी यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ' मोरानी यांनी लग्नाचे आमिष दाखवून माझ्यावर बलात्कार केला ' असा आरोप दिल्लीतील एका महिलेने केला असून याप्रकरणी हयातनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
'मोरानी यांनी २० माझ्यावर दिल्ली व मुंबईतील एका फिल्म स्टुडिओत बलात्कार केला' असे त्या २५ वर्षीय तरूणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. ही घटना २०१५साली  घडली होती. याप्रकरणी मोरानी यांच्याविरोधात भारतीय दंडविधान संहितेतील कलम ४१७, ३७६, ३४२, ५०६ आणि ४९३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करीम मोरानी यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले असून सदर महिला खोट बोलत असल्याचे म्हटले आहे.