‘राजवाडे अँड सन्स’ हा चित्रपट एका एकत्र कुटुंबाची गोष्ट आहे. असं एकत्र कुटुंब जे अतिशय सधन आहे, अनेक व्यवसाय करणारं आहे. या कुटुंबात ३ पिढ्या एकत्र राहत आहेत. त्यामुळे साहजिकच काळानुसार होणारी पिढ्या-पिढ्यांमधली तगमग यात पाहायला मिळते. दिग्दर्शक सचिन कुंडलकर सांगत होता की, या चित्रपटात एक दृश्य होतं, की अभिनेता राहुल मेहेंदळे चिडून मृण्मयी गोडबोलेला मारतो आहे. अगदी छोटं दृश्य होतं. हे दृश्य कसं चित्रित करावं, हे बराच वेळ आम्ही ठरवत होतो. पण मला हवं तसं ते दृश्य होत नव्हतं. त्या वेळी शूटला नसलेला अतुल थोड्या वेळाने आला आणि त्याला कळलं, की हा मारायचा सीन जरा अडला आहे. अतुल कुलकर्णी सांगत होता, की साधं मारणं असो किंवा मोठी फायटिंग असो, चित्रपटासाठी करताना ती नीट बसवावी लागते... म्हणजे कोरिओग्राफ करावी लागते. सचिन सांगतो, मग अतुलनेच तो मारायचा सीन स्वत: कोरिओग्राफ केला. दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमांमध्ये अनेक उत्तम फाइट मास्टर्सबरोबर काम केल्यामुळे अतुलला त्याचं टेक्निक चांगलं माहीत होतं. त्यानंतर राहुल आणि मृण्मयीने जास्त आत्मविश्वासाने तो सीन पूर्ण केला. माझ्याही तो पसंतीला उतरला. ‘राजवाडे अॅँड सन्स’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. हा चित्रपट १६ आॅक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला.
फाइट मास्टर अतुल!
By admin | Updated: October 31, 2015 00:39 IST