Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' चित्रपटाच्या गाण्यासाठी शाहरुख खानने दोन दिवस पाणी प्यायले नव्हते; फराह खानचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 19:42 IST

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. तो त्याच्या चित्रपटानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो.  त्याच्या अभिनयाने सगळेच वेडे आहेत.  तो प्रत्येक चित्रपटातील भुमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतो. असाच एक किस्सा बॉलिवूडची प्रसिद्ध फिल्म मेकर आणि कोरिओग्राफर फराह खानने शेअर केला आहे.

ओम शांती ओम चित्रपटातील 'दर्द-ए-डिस्को' गाण्यासाठी शाहरुख खानने २ दिवस पाणी प्यायले नव्हते. ज्याचा खुलासा खुद्द दिग्दर्शक फराह खानने 16 वर्षांनंतर केला आहे. ओम शांती ओम हा चित्रपट 9 नोव्हेंबर 2007 रोजी प्रदर्शित झाला, ज्याचे दिग्दर्शन फराह खानने केले होते. या चित्रपटातून दीपिका पदुकोणनेही डेब्यू केला होता.

शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, शाहरुख खान चार वर्षे सिनेसृष्टीपासून दूर होता. त्यानंतर 'पठाण' मधून त्याने जोरदार कमबॅक केलं. त्यानंतर त्याचा 'जवान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. आता आता त्याचा 'डंकी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हा सिनेमाही हिट झाला तर यावर्षातला हा शाहरुखचा सलग तिसरा सुपरडुपर हिट सिनेमा ठरणार आहे. 

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडफराह खान