मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा महाजन बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून फोटो आणि तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांशी शेअर करत असते. नेहा फिटनेस फ्रिक असून बऱ्याचदा ती फिटनेसचे व्हिडीओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी नेहा महाजनने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे, त्यात तिची अवस्था पाहून चाहते चिंतेत पडले आहेत.
अभिनेत्री नेहा महाजन हिने इंस्टाग्रामवर तिचा फोटो शेअर केला आहे, ज्यात ती वेगळी दिसते आहे. तिचा हा फोटो आंघोळीनंतरचा आहे. यात तिने जास्वंदाची फुले केसात माळलेले दिसत आहे.
तिचा हा विना मेकअपमधील फोटो पाहून चाहते चिंतेत पडले आहेत. तिच्या या फोटोवर नेटकरी तिला स्माईल करायला सांगत आहेत. तर कुणी फुलराणी म्हणते आहे तर बरेच जण तुला काय झाले आहे, असेदेखील विचारताना दिसत आहे.
अभिनेत्री नेहा महाजनने 'कॉफी अॅण्ड बरेच काही', 'निळकंठ मास्तर' व 'वन वे तिकिट' या मराठी चित्रपटात काम केले आहे. मराठी, तमीळ व इंग्रजी चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. 'जीबून संदेश' या आोरिया फिल्ममध्ये भूमिका केल्या आहेत. 'द पेंटेड हाऊस' या सिनेमातून तिने २०१५ साली मॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ती रणवीर सिंगच्या सिंबा चित्रपटातही झळकली आहे.
नेहाचा जन्म हा भारतातील असला तरी नेहाने युएसएमधील टेक्सास येथील ट्रिंबल टेक हायस्कूलमध्ये अभिनयाचे धडे गिरवले आहे. तिला अभिनयासोबतच सतार वादनाचीदेखील आवड आहे हे खूप कमी लोकांना माहित आहे.
नेहाचे वडील पंडित विदुर महाजन हे प्रसिद्ध सतार वादक आहेत. वडिलांना सतार वाजवताना पाहून नेहा देखील या वाद्याच्या प्रेमात पडली. वडिलांसोबत नेहा कार्यक्रमात सहभाग घेते.