Join us

बाबो..! रिंकू राजगुरूचा साडीतील व्हिडिओ पाहून घायाळ झाला चाहता, थेट घातली लग्नाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 17:00 IST

रिंकू राजगुरुचा साडीतील व्हिडिओ पाहून प्रेमात पडला चाहता आणि घातली लग्नाची मागणी

सैराटमधील आर्चीच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या लॉकडाऊनमुळे तिच्या मूळ गावी अकलूजला आहे. मात्र ती सोशल मीडियावर एक्टिव्ह असून चाहत्यांशी संवाद साधत आहे. नुकताच तिने साडीतील एक व्हिडिओ टाकला आहे. नेहमीप्रमाणे तिच्या या व्हिडिओवर खूप लाइक्स व कमेंट्स येत आहेत. मात्र या व्हिडिओवरील एका कमेंट्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

रिंकू राजगुरुने साडीतील एक व्हिडिओ इंस्टाग्राम शेअर केला आहे. त्यात तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. व्हिडीओत तिचा चेहरा साडीच्या पदराने झाकलेला दिसतोय. मग हळूच ती चेह-यावरचा पदर बाजूला करते आणि खूप छान स्माईल देते. तिच्या या व्हिडिओला खूप लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहे.

मात्र या व्हिडिओवरील एका कमेंट्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओवर एका चाहत्याने तिला चक्क आय लव्ह यू म्हणत लग्नाची मागणी घातली आहे.

सैराट चित्रपटानंतर रिंकूला अनेक ऑफर्स आल्या. यानंतर ती कागर, मेकअप या मराठी सिनेमांमध्ये दिसली. त्यानंतर ती नुकतीच हंड्रेड या हिंदी वेबसीरिजमध्ये झळकली. यात लारा दत्ताही मुख्य भूमिकेत होती.

लवकरच रिंकू बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे झुंड. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे करत आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरूलारा दत्ता