Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 19:11 IST

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन झालं आहे. रंगभूमीवरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन झालं आहे. रंगभूमीवरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या या कलाकाराने स्टेजवरुनच एक्झिट घेतली. सृजन द क्रिएशन या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्ताने एक कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमात सतीश जोशी देखील सहभागी झाले होते. हा कार्यक्रम सुरू असतानाच स्टेजवर कोसळून त्यांचे निधन झाले.   

सतीश जोशी यांचे मित्र राजेश देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या निधनाबाबत माहिती दिली आहे. "आमचे ज्येष्ठ मित्र अभिनेते सतीश जोशी यांचे आज रंगोत्सवात स्टेजवरच दुःखद निधन झाले जाण्यापूर्वी त्यांनी अभिनय पण केला होता",असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.  

सतीश जोशी यांनी अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. भाग्यलक्ष्मी या मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली होती. या मालिकेमुळे ते घराघरात पोहोचले होते. त्यांच्या निधनावर चाहते आणि सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीमृत्यू