Join us

नात्यांना जोडणारा ‘फॅमिली कट्टा’

By admin | Updated: October 7, 2016 04:56 IST

आजच्या इंटरनेटच्या युगात माणसे स्वत:मध्येच हरवून चालली आहेत. सोशल मीडियावर सतत अपडेटेड राहताना आपल्या माणसांपासून आपण कधी दुरावतो, हे समजतच नाही.

आजच्या इंटरनेटच्या युगात माणसे स्वत:मध्येच हरवून चालली आहेत. सोशल मीडियावर सतत अपडेटेड राहताना आपल्या माणसांपासून आपण कधी दुरावतो, हे समजतच नाही. सध्याची तरुणाई तर फॅमिलीपासून नकळतपणे लांब जाऊ लागली आहे. लग्न झाल्यानंतरदेखील मुलांना आई-वडिलांसोबत एकत्र राहायचे नसते. या अशा प्रकारांमुळे नात्यांमध्ये आलेला दुरावा प्रेक्षकांसमोर अलगदपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे निर्मात्या वंदना गुप्ते यांनी ‘फॅमिली कट्टा’ या चित्रपटाच्या माध्यमातून. या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे चंद्रकांत कुलकर्णी यांनी. फॅमिली कट्टा हा विषय प्रत्येकाच्या जवळ जाणारा आणि भावनांना जोडणारा आहे. ही कथा आहे सबनीस कुटुंबाची. या कुटुंबातील सर्वच सदस्य वेगळे राहत असतात. आजी-आजोबांच्या लग्नाचा ५०वा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व जण एकत्र येतात. त्या वेळी काय-काय घटना घडतात? ही फॅमिली या घटनानंतर पुन्हा एकत्र येते का? या सर्व प्रश्नांची उत्तर मिळविण्यासाठी आपल्याला फॅमिली कट्टा चित्रपट पाहावा लागणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सई ताम्हणकर, किरण करमरकर, प्रतीक्षा लोणकर, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, अलोक राजवाडे, सुलेखा तळवलकर, गौरी नलावडे, संजय खापरे, सचिन देशपांडे हे कलाकार प्रेक्षकांना या चित्रपटात दिसणार आहेत.