Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रयोगशील दिग्दर्शक!

By admin | Updated: June 30, 2017 02:34 IST

काही दिग्दर्शकांची निर्मिती ही एक स्टेटमेंट असते. दृश्यात्मकतेची चांगली जाण, माध्यमांवरील योग्य पकड यामुळे दिग्दर्शक गिरीश मोहिते

काही दिग्दर्शकांची निर्मिती ही एक स्टेटमेंट असते. दृश्यात्मकतेची चांगली जाण, माध्यमांवरील योग्य पकड यामुळे दिग्दर्शक गिरीश मोहिते यांची प्रत्येक दिग्दर्शकीय कलाकृती वेगळी ठरली आहे. स्वत:ला पडलेले प्रश्न, आजबाजूच्या समस्या दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी आपल्या सिनेमातून आजवर मांडल्या आहेत. ७ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या ‘कंडिशन्स अप्लाय अटी लागू’ या आगामी मराठी सिनेमातूनही ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा विषय त्यांनी समर्थपणे हाताळला आहे. संस्कृती सिनेव्हिजन प्रॉडक्शनच्या डॉ. संदेश म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.या कलाकृतीबद्दल बोलताना गिरीश मोहिते सांगतात की, सध्याची पिढी स्वतंत्र विचारसरणीची आहे. भावभावनांपेक्षाही प्रोफेशनॅलीझम त्यांना जास्त महत्त्वाचा वाटतो. तसेच पूर्वानुभवावर स्वत:ची तयार केलेली मते, आपण निवडलेली वाट व त्यावरच चालण्याचा दुराग्रह यामुळे नात्यांमध्ये निर्माण होणारा तणाव आज बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतोय. ‘कंडिशन्स अप्लाय’मध्ये यावरच भाष्य करण्यात आले आहे. स्वरा आणि अभय या दोघांची भेट होते, त्यांची मने जुळतात आणि मग लग्न न होता दोघेही ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचा निर्णय घेतात. त्यानंतर या दोघांमध्ये विविध कारणांनी खटके उडू लागतात, या भांडणांमुळे दोघांमध्ये दुही निर्माण होते. ही दुही नेमकं काय साध्य करणार? हे सांगू पाहणारा सिनेमा म्हणजे ‘कंडिशन्स अप्लाय’. ‘कंडिशन्स अप्लाय’ मध्ये सुबोध भावे, दीप्ती देवी, अतुल परचुरे, राधिका विद्यासागर, मिलिंद फाटक, राजन ताम्हणे, अतिशा नाईक, डॉ. उत्कर्षा नाईक, विनीत शर्मा या कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन संजय पवार यांचे आहेत. छायांकन कृष्णा सोरेन यांचे, तर संकलन नीलेश गावंड यांचे आहे.