Join us
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive - ओरिजनल रोशन परतली

By admin | Updated: August 16, 2016 15:45 IST

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील रोशन या भुमिकेच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. जेनिफर मिस्त्री पुन्हा एकदा मालिकेत कमबॅक करत आहे

- सीएनएक्स एक्सक्लुझिव्ह
मुंबई, दि. 16 - 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील रोशन या भुमिकेच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. जेनिफर मिस्त्री पुन्हा एकदा मालिकेत कमबॅक करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा सुरुवातीप्रमाणे जेनिफर मिस्त्रीला रोशनच्या भुमिकेत पाहायला मिळणार आहे. 
 
मालिकेत रोशनची भूमिका सध्या दिलखूश रिपोर्टर साकारत आहे. रोशन पती-पत्नीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडते. तिच्याआधी ही भूमिका जेनिफर मिस्त्री बनसिवाल साकारत होती. गरोदर असल्याने जेनिफरने ही मालिका सोडली होती. त्यामुळे गेली दोन वर्षं दिलखूश रोशनची भूमिका साकारत आहे. मात्र आता दिलखूश तिच्या वैयक्तिक कारणामुळे ही मालिका सोडत आहे आणि या मालिकेत ओरिजनल रोशन परतत आहे. जेनिफरने या मालिकेच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवातदेखील केली आहे.