Join us

सगळीकडे ‘आर्ची’च ‘आर्ची’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2016 02:57 IST

सध्या ‘सैराट’ फेम आर्चीचा बोलबाला आहे. सगळीकडे आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचीच जादू पाहायला मिळतेय. अनेक कार्यक्रमांमध्येही फक्त आर्ची आणि आर्चीच पाहायला मिळतेय

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २३ : सध्या ‘सैराट’ फेम आर्चीचा बोलबाला आहे. सगळीकडे आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचीच जादू पाहायला मिळतेय. अनेक कार्यक्रमांमध्येही फक्त आर्ची आणि आर्चीच पाहायला मिळतेय. त्यामुळं मराठीतल्या आघाडीच्या इतर नायिकांची जादू कमी झाली की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. एरव्ही प्रत्येक कार्यक्रमात दिसणाऱ्या आणि सिनेमांमध्ये झळकणाऱ्या नायिकांचं धाबं दणाणलंय.

एकेकाळी सई ताम्हणकर, प्रिया बापट, अमृता खानविलकर, मुक्ता बर्वे यांसारख्या आघाडीच्या नायिका मराठी चित्रपटसृष्टीत वर्चस्व गाजवत होत्या आणि त्या रसिकांच्याही फेव्हरेट होत्या. मात्र आता या सगळ्यांना विसरून सध्या आर्चीच साऱ्यांची लाडकी बनल्याचे दिसतंय. त्यामुळेच आर्चीमुळे इतर नायिकांची जादू कमी झाल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्यात.