जीवन सुंदर आहे... आपल्या आजूबाजूंच्या लोकांमुळे आपल्या जीवनात खास असं स्थान असतं त्यामुळे त्याला नाती असं म्हटलं जातं...याच नात्यांमधून जे दृढसंबंध निर्माण होतात त्यांना नातेसंबंध असं म्हटलं जातं.. ही नाती रक्ताची असतात, ही नाती भावनिक असतात. आयुष्यातल्या आलेल्या प्रत्येक चढ-उतारवेळी आपली हीच नाती जीवनात अनन्यसाधारण भूमिका निभावतात. १४ फेब्रुवारी म्हटले की, आपले आवडते कलाकार मंडळी ‘व्हॅलेंटाइन डे’ च्या दिवशी काय करतात? हा दिवस कसा साजरा करणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण होतात. आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकणारा अभिनेता अभिजित खांडकेकरच्या चाहत्यांसाठीही त्याच्या ‘व्हॅलेंटाइन डे’ विषयी कुतूहल नक्कीच असेल. अभिजितला या दिवसाविषयी काय वाटते? यंदाचा व्हॅलेंटाइन तो कसा साजरा करणार? हे आम्ही त्याच्याकडूनच जाणून घेतलंय.व्हॅलेंटाइन डे विषयी तुझं काय मत आहे?सध्या चांगुलपणा हरवत चालला आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने सर्वांशी आपुलकी आणि प्रेमाने वागत प्रेमाचा, आपलेपणाचा गोड संदेश आपण सगळ्यांना द्यायला हवा असं मला वाटतं. हा दिवस फक्त कपल्सनेच सेलिब्रेट करावा असं नाही, तर प्रत्येक नात्यामधला प्रेमाचा गोडवा वाढावा यासाठी या दिवसाचं औचित्य साधायला हवं. प्रेमाचे सेलिब्रेशन हे झालंच पाहिजे. मग, ते नाते कुठलंही असो. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा व्हॅलेंटाइन डे असतो. त्यामुळे तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत हा दिवस नक्कीच साजरा करा. यंदाचा व्हॅलेंटाइन डे तू कशाप्रकारे साजरा करणार?आमच्या लग्नाचा वाढदिवस १ फेब्रुवारीला असतो. त्यामुळे १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी आम्ही व्हॅलेंटाइन वीक सेलिब्रेट करतो. यंदा कामाचं व्यस्त शेड्यूल असल्यामुळे हटके काहीतरी करणं शक्य नसलं, तरी एक छानसं प्लेझंट सरप्राइज सुखदाला देणार आहे. हृदयाच्या कप्प्यात कायम राहावा अशा पद्धतीने ‘व्हॅलेंटाइन डे’चे सेलिब्रेशन करणार आहे. तुझ्या लक्षात राहिलेली व्हॅलेंटाइन डेची एखादी गोड आठवण जाणून घ्यायला आवडेल?सुखदासोबत आयुष्यात घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खास आहे. त्यातल्या त्यात ‘व्हॅलेंटाईन डे’ दोघांसाठी स्पेशल ठरावा, असा माझा प्रयत्न असतो. प्रत्येक ‘व्हॅलेंटाईन डे’ माझ्यासाठी खास आहे. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी मी सुखदासाठी स्वत: स्वयंपाक बनवला होता; तो कितपत चांगला झाला ते माहीत नाही, मात्र सुखदासाठी तो एक सुखद धक्का होता. तसंच एका ‘व्हॅलेंटाइन डे’ला आम्ही गेट आॅफ इंडियाला फिरायला गेलो होतो तेथे मी सुखदासाठी एक यॉर्ट बुक केली होती. अथांग समुद्राचं आणि सूर्यास्ताचं विहंगम दृश्य मनात साठवत आम्ही हा दिवस साजरा केला होता. माझ्या एका आगामी चित्रपटातील एक रोमँटिक गीत आम्ही क्रूझवर चित्रीत केले आहे. या गाण्याच्या निमित्ताने आम्ही सेलिब्रेट केलेल्या रोमँटिक डेटच्या आठवणीला पुन्हा उजाळा मिळाला.
प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा ‘व्हॅलेन्टाईन डे'
By admin | Updated: February 13, 2017 02:42 IST