Join us

‘पर्यावरणप्रेमी’ संतोष जुवेकर !

By admin | Updated: February 13, 2017 02:43 IST

आजच्या गॅझेटच्या युगात प्रत्येक व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टिवटरच्या दुनियेत व्यग्र झाला आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या युगातही व्यक्तीला स्वत:कडे पाहण्यासाठी वेळ नसतो.

आजच्या गॅझेटच्या युगात प्रत्येक व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टिवटरच्या दुनियेत व्यग्र झाला आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या युगातही व्यक्तीला स्वत:कडे पाहण्यासाठी वेळ नसतो. अशा या परिस्थितीत व्यक्ती पर्यावरणापासून तर पूर्णच दूर झालेली दिसत आहे. त्यांना पर्यावरणाशी काहीच देणं-घेणं नसतं. एकवेळ हेच लोक सोशल मीडियावरून पर्यावरणाचा संदेश देतील. मात्र, स्वत:च प्रत्यक्षात पर्यावरणाची काळजी घेणार नाहीत. पण, या परिस्थितीत अभिनेता संतोष जुवेकर हा अपवाद ठरला असल्याचे पाहायला मिळत आहे. होय, कारण या अभिनेत्याने नुकतेच सोशल मीडियावरून केलेल्या व्हिडीओ आणि पोस्टवरून त्याचे पर्यावरणप्रेम समोर आले आहे. त्याने नुकतेच आपल्या घराच्या गॅलरीमध्ये अत्यंत सुंदररित्या लावलेल्या रोपट्यांचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. त्याच्या या व्हिडीओमध्ये त्याच्या अत्यंत प्रशस्त अशा गॅलरीमध्ये त्याने कशा पद्धतीने झक्कासपणे रोपटी लावली आहेत. त्याचबरोबर माझे हे होम गार्डन हे माझ्या परिवारातील सदस्यच आहेत, असा सुंदर संदेशही त्याने दिलाय. त्यामुळे त्याने त्याच्या चाहत्यांसमोर एक सुंदर आदर्श ठेवला आहे.