ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 10 - श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर लवकरच बॉलीवूडमध्ये एंट्री करणार आहे. 'शिद्दत' या आगामी चित्रपटात ती आलिया भट्टला रिप्लेस करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. या चित्रपटात नायक म्हणून वरुन धवनच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. करण जोहरच्या निर्मितीत आणि अभिषेक वर्मनच्या दिगदर्शनामध्ये तयार होणाऱ्या या चित्रपटासाठी सुरुवातीला आलिया भट्टचे नाव निश्चित झाले होते. पण आता जान्हवी तिच्या जागी या चित्रपटात असेल. यामागची कारणे मात्र समोर आलेली नाहीत. तर जानव्हीच्या नावाची आतापर्यंत अधिकृत घोषणा झालेली नाही.
वरुण धवन सध्या बद्रिनाथ की धुलनिया या चित्रपटात आलिया भट्ट सोबत काम करत आहे. त्यानंतर घरच्या बॅनरखाली बनत असलेल्या जुडवाच्या रिमेकमध्ये काम करणार आहे. 2017 च्या सुरवातीला शिद्धत या चित्रपटाचे शुटींग सुरु होणार आहे. तर वर्षाखेरीस तो चित्रपटगृहात झळकेल. दरम्यान, गजनी आणि हॉलिडे या सिनेमांचे दिग्दर्शक ए. आर. मुरुगदास आपल्या एका तेलगू सिनेमात जान्हवीला साईन करु इच्छित होते. यानिमित्ताने त्यांनी बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची भेटदेखील घेतली, मात्र दोघांनीही यासाठी नकार दिला होता.