Join us

'बिग बीं'ची टेनिस कोर्टवर एंट्री

By admin | Updated: December 4, 2015 13:05 IST

बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन आता टेनिस कोर्टवर उतरण्यास सज्ज झाले असून ते आंतरराष्ट्रीय प्रिमियर टेनिस लीगमधील ओयूई सिंगापूर स्लॅमर्स संघाचे सहमालक बनले आहेत.

ऑनलाईन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ४ - बॉलिवुडमधले सेलिब्रिटी विविध क्रीडा प्रकारातील संघ विकत घेत असताना आता यामध्ये अमिताभ बच्चन यांचाही समावेश झाला आहे. बॉलिवुडचे शहेनशहा अमिताभ बच्चन आंतरराष्ट्रीय प्रिमियर टेनिस लीगमधील ओयूई सिंगापूर स्लॅमर्स संघाचे सहमालक बनले आहेत. स्वत: बिग बींनीच ही माहिती दिली. 

स्थानिक कंपनी यूडी ग्रुपने वर्षाच्या सुरुवातीला ओयूई सिंगापूर संघ विकत घेतला होता. २० डिसेंबरला अमिताभ स्वत: सिंगापूर इनडोअर स्टेडियममध्ये सामन्याला उपस्थित रहाणार आहेत. यावेळी ते चाहत्यांशी संवाद साधतील. 
दरम्यान अमिताभ यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन हाही क्रीडा क्षेत्रात उतरला असून तो 'प्रो कबड्डी लीग'मधील जयपूर संघाचा मालक आहे.