Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक भूमिका एन्जॉय करते

By admin | Updated: November 5, 2016 02:28 IST

बालिकावधू या मालिकेत सुरेखा सिक्री यांनी साकारलेली दादीसा ही भूमिका प्रचंड गाजली होती.

-प्राजक्ता चिटणीस

बालिकावधू या मालिकेत सुरेखा सिक्री यांनी साकारलेली दादीसा ही भूमिका प्रचंड गाजली होती. सुरेखा सिक्री गेली अनेक वर्षं छोट्या पडद्यावर काम करत आहेत. त्या आता ‘परदेस में है मेरा दिल’ या मालिकेत एका प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या मालिकेबाबत त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...‘परदेस में है मेरा दिल’ या मालिकेचे चित्रीकरण आॅस्ट्रियामध्ये करण्यात आले होते. या मालिकेतील अनेक कलाकार चित्रीकरणासाठी तिथे गेले होते; पण तुम्ही गेला नाहीत. याचे काही विशेष कारण आहे का?- मला आता वयानुसार चालायला थोडा त्रास होतो. मुंबईत चित्रीकरण असले की तितका प्रवास करावा लागत नाही. पण आॅस्ट्रियापर्यंत प्रवास करणे माझ्या शरीराला झेपणारे नव्हते. त्यामुळे मी चित्रीकरणासाठी तिथे गेले नाही. माझे सगळे चित्रीकरण आम्ही येथेच करत आहोत. आम्ही आॅस्ट्रियात आहे असे दाखवण्यासाठी येथे जॅकेट घालून आम्ही चित्रीकरण करतो. खरे तर यात खूप गरम होते. पण काम करायचे असे ठरवले की त्यासाठी कारणे देणे हे मला आवडत नाही. ‘बनेगी अपनी बात’ या मालिकेत तुम्ही नव्वदच्या दशकात काम केले होते. आज इतकी वर्षे छोट्या पडद्यावर काम करत असताना तुम्हाला काही फरक जाणवतो का?- छोटा पडदा हा अतिशय ताकदवान आहे असे मला नेहमीच वाटते. यामुळे कलाकाराला एक वेगळी ओळख मिळते. गेल्या काही वर्षांत अधिक व्यावसायिकपणा या इंडस्ट्रीत आलेला आहे. तसेच सगळ्या बाबतींत आपण अधिक कुशल झालेलो आहोत असे मला वाटते. तसेच दिवसेंदिवस ही इंडस्ट्री अधिक मोठी होत आहे आणि अधिकाधिक लोकांपर्यंत यामुळे कलाकारांना पोहोचण्याची संधी मिळत आहे. ही प्रत्येक कलाकारासाठी खूप चांगली गोष्ट आहे.तुम्ही कधी खडूस आजीची भूमिका साकारता, तर कधी प्रेमळ आईच्या भूमिकेत असता. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅन्सना भेटता त्या वेळी त्यांची प्रतिक्रिया कशी असते?- फॅन्सना भेटल्यावर नेहमीच त्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. त्यांच्याकडूनच आम्हाला आमच्या कामाची पावती मिळते. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रिया या आमच्यासाठी अमूल्य असतात. आमच्या व्यक्तिरेखांचे ते कौतुक करतात तसेच त्यांना खटकणाऱ्या गोष्टीदेखील आम्हाला सांगतात. ‘परदेस में है मेरा दिल’ या मालिकेत तर माझ्या भूमिकेला अनेक शेड्स असल्याने प्रेक्षकांना ही भूमिका अधिक आवडेल याची मला खात्री आहे.तुम्ही या मालिकेत एका आजीची भूमिका साकारत आहात. खऱ्या आयुष्यात तुमच्या नातवंडांसोबत तुमचे नाते कसे आहे?- माझ्या भावा-बहिणींना नातवंडे आहेत. त्यांच्यासोबत माझे नाते खूपच चांगले आहे. खरे तर मी चित्रीकरणात व्यग्र असल्याने कुटुंबीयांना देण्यासाठी माझ्याकडे खूपच कमी वेळ असतो. तरीही मी त्यांना वेळ देण्याचा नेहमीच प्रयत्न करते.