Join us

रणवीरच्या पॉडकास्टमध्ये आला इमरान हाश्मी; म्हणाला, "मला माहितीये तुझ्या आयुष्यात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:55 IST

रणवीर अलाहाबादियाने त्याच्या आयुष्यात नुकत्याच घडलेल्या घटनेचा उल्लेख केला

रणवीर अलाहाबादिया(Ranveer Allahbadia) हे नाव आता सर्वांनाच माहित झालं आहे. इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये केलेलं एक विधान त्याच्या अंगलट आलं. त्याआधीपासून अलाहाबादियाचं 'द रणवीर शो' पॉडकास्ट चर्चेत होतं. रणवीर पॉडकास्टमध्ये अनेक दिग्गज व्यक्तींच्या मुलाखती घ्यायचा. लेटेंट शोमधील वादानंतर रणवीरचे पॉडकास्ट थांबले होते. मात्र त्याने माफी मागितल्यानंतर न्यायालयाने त्याची सुटका केली. आता त्याने पुन्हा आपल्या पॉडकास्टला सुरुवात केली आहे. यामध्ये नुकतंच अभिनेता इमरान हाश्मीने (Emraan Hashmi) हजेरी लावली.

'द रणवीर शो' मध्ये रमवीर अलाहाबादिया म्हणतो, "मला माहित नाही माझ्या आयुष्यात नुकतंच काय घडलं याची तुला कल्पना आहे की नाही." यावर इमरान हाश्मी म्हणतो, "मला माहित आहे. मला वाटतं सगळ्यांनाच याची कल्पना आहे. जेव्हा तुम्ही अपयशी होता तेव्हा तुम्हाला कळतं की तुमचे खरे मित्र कोण आहेत. कारण सगळे तुम्हाला सोडून निघून जातात. मग तुमच्याजवळ जे लोक राहतात तेच मौल्यवान असतात. तुमच्या कठीण प्रसंगात जे तुमचा आधार होतात तेच खरे मित्र. इंडस्ट्रीत मैत्री या संकल्पनेला चुकीचं दाखवलं जात आहे. जे तुमच्यासोबत पार्टी करतात, गॉसिप करतात ते तुमचे गरजेनुसार झालेले मित्र आहेत. ती काही मैत्री नसते.  

इमरान हाश्मीचा 'ग्राऊंड झिरो' सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी त्याने पॉडकास्टमध्ये हजेरी लावली.  यामध्ये सई ताम्हणकर, ललित प्रभाकर यांचीही भूमिका आहे. इमरान यामध्ये आर्मी ऑफिसरची भूमिका साकारत आहे. याआधी इमरानची ओळख सीरियल किसर' अशीच झाली होती. मात्र आता तो त्याची ही प्रतिमा पुसत नवीन गोष्टी करत आहे. 'ग्राऊंड झिरो'च्या ट्रेलरवर सर्वांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता इमरानला या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

टॅग्स :रणवीर अलाहाबादियाइमरान हाश्मीबॉलिवूड