Join us

‘एलिझाबेथ एकादशी’

By admin | Updated: November 8, 2014 03:28 IST

‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’च्या यशानंतर परेश मोकाशी ‘एलिझाबेथ एकादशी’ या आगळ््यावेगळ््या नावाचा चित्रपट घेऊन येत आहेत

‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’च्या यशानंतर परेश मोकाशी ‘एलिझाबेथ एकादशी’ या आगळ््यावेगळ््या नावाचा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाची कथा मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिली आहे. त्याची पटकथा-संवादही त्यांनी परेश मोकाशींसह लिहिले आहेत. पंढरपूरमधील ज्ञानेशला विठ्ठलाची ओढ आहे. त्याचं आपल्या वडिलांनी दिलेल्या सायकलवरही (एलिझाबेथ) अतोनात प्रेम आहे. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर ज्ञानेशच्या कुटुंबावर आलेल्या संकटातून एलिझाबेथला वाचवण्यासाठी ज्ञानेश त्याच्या सवंगड्यांसह एकादशी उत्सवात एक खेळ मांडतात. त्याची कथा म्हणजे ‘एलिझाबेथ एकादशी!’ येत्या १४ नोव्हेंबरला बालदिनी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.