Join us
Daily Top 2Weekly Top 5

'दिल दोस्ती'मधील हा भिडू एकता कपूर बरोबर करणार काम

By admin | Updated: March 11, 2017 18:47 IST

टीव्हीवर चालणा-या सासू-सूनेच्या सिरीयल आणि तेच ते रिएलिटी शोज पाहून जर तुम्ही कंटाळलेले असाल. एकता कपूर भन्नाट वेबसिरीज घेऊन येणार आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - आजची तरूणाई मालिकांच्या जंजाळात फारशी अडकत नसली तरी झी मराठीवरील 'दिल दोस्ती दोबारा' अर्थात D3 ही मालिका मात्र लहान मुलांपासून-वयोवृद्धापर्यंत सर्वजण आवडीने पाहतात. या मालिकेमधील प्रत्येक कलाकाराने आपली वेगळी छाप सोडली आहे. प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सहा जणांच्या मैत्रीवर असलेल्या मालिकेने अल्पवधीतच सर्वांच्या मनात घर केलं आहे. याच मालिकेतील अमेय वाघ एकता कपूरच्या वेब सिरीजमध्ये काम करणार आहे. 
 
टीव्हीवर चालणा-या सासू-सूनेच्या सिरीयल आणि तेच ते रिएलिटी शोज पाहून जर तुम्ही कंटाळलेले असाल. एकता कपूर भन्नाट वेबसिरीज घेऊन येणार आहे. एकता कपूरचं ‘ऑल्ट बालाजी’ प्रोडक्शन बॉयगिरी ही मालिका, मैत्री, मस्ती आणि मुला-मुलांची एकमेकांशी व्यक्त होण्याची गंमतीशीर भाषा ह्यावर आहे.
 
नावाप्रमाणेच ‘बॉयगिरी’ मालिका आपल्याला ब्रोमॅन्सच्या विश्वात घेऊन जाते. एकत्र राहताना त्यांच्यातला घट्ट होत जाणारा ऋणानुबंध, त्याचवेळी ‘मेन नेव्हर ग्रो अप’ ह्या तत्वावर दिसणारं त्यांचं मजेशीर वागणं, पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही मालिका पाहताना प्रत्येक पुरूषाला त्याच्या स्वत:च्या तरूणपणीच्या मित्रांची आठवण नक्कीच होईल.
 
ह्या बॉयगिरीमध्ये प्रनवेश, अव्दैत, मनजोत, जतीन, रवी आणि बंदा अशी काही मनोरंजक पात्र दिसणार आहेत. ह्या सगळ्या मित्रांची मालिका दर एपिसोडगणिक मजेदार होत जाताना दिसेल. काही गंमतीशीर घटानाक्रमामध्ये अडकल्यावर व्यक्ति तितक्या प्रकृती ह्या न्यायाने ह्या मालिकेतली पात्र वेगवेगळ्या पध्दतीने व्यक्त होतात. तेव्हा पाहणा-याची हसून-हसून अक्षरश: मुरुकुंडी वळते.
 
 
 
अभिनेता अमेय वाघची ह्या मालिकेतली भूमिका एका खोडकर मुलाची आहे. ह्याविषय़ी तो अधिक सांगतो, “बॉयगिरी मालिकेतली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे अगदी ख-या आयुष्यातले काही जवळचे मित्र ह्य़ा मालिकेसाठी एकत्र आलेत.