Join us
Daily Top 2Weekly Top 5

'डंकी'तलं पहिलं गाणं 'लुट पुट गया' रिलीज, तापसी पन्नूच्या प्रेमात आकंठ बुडालेला दिसला शाहरुख खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 16:15 IST

Dunki Movie : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा आगामी बहुप्रतिक्षीत चित्रपट डंकीतील 'लुट पुट गया' गाणं रिलीज झाले आहे.

शाहरुख खानचा डंकी (Dunki) हा चित्रपट यंदाच्या ख्रिसमसच्या खास मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. पठाण आणि जवान नंतर आता शाहरुख खानच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाचे बहुप्रतिक्षित लूट-पुट हे गाणे रिलीज झाले आहे. हा एक रोमँटिक ट्रॅक आहे, जिथे शाहरुख खान तापसी पन्नूच्या प्रेमात वेडा झालेला दिसतो.  अलीकडेच, निर्मात्यांनी डंकी चित्रपटाचा पहिला ड्रॉप प्रदर्शित केला, ज्याला प्रेक्षकांचा खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सेन्सॉर बोर्डाने यू सर्टिफिकेट दिले आहे. या चित्रपटाचे दोन टीझर रिलीज होणार असल्याचे वृत्त आहेत. शाहरुख खानचा डंकी हा त्याच्या 'जवान' आणि 'पठाण' या चित्रपटांपेक्षा पूर्णपणे वेगळा असणार आहे. 

डंकी हा चित्रपट चार मित्रांची हृदयस्पर्शी कथा आहे आणि त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी त्यांनी केलेला कठीण पण जीवन बदलून टाकणारा प्रवास रेखाटण्यात आला आहे. वास्तविक जीवनातून प्रेरणा घेऊन, डंकी ही प्रेम आणि मैत्रीची गाथा आहे जी भिन्न कथा एकत्र विणते आणि आनंददायक आणि हृदयस्पर्शी उत्तरे देऊन जाणार आहे. या चित्रपटात शाहरुखशिवाय तापसी पन्नू आणि विकी कौशल हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

'डंकी' या सिनेमाची निर्मिती रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि जियो स्टुडीओच्या बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे. राजकुमार हिरानींच्या या चित्रपटात शाहरुख पहिल्यांदाच झळकणार आहे. शाहरुख खान चार वर्षे सिनेसृष्टीपासून दूर होता. त्यानंतर 'पठाण' मधून त्याने कमबॅक केलं. त्यानंतर त्याचा 'जवान' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. आता आता त्याचा 'डंकी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

टॅग्स :शाहरुख खानडंकी' चित्रपटतापसी पन्नूविकी कौशल