Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांदा आई बनली डिंपी गांगुली; सोशल मीडियावर शेअर केला बाळाचा फोटो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 19:00 IST

डिंपीने मागील डिसेंबरमध्ये सोशल मीडियावर ती प्रेगनंट असल्याचे सांगितले होते. तिने तिचा बेबी फ्लांट करतानाचा फोटो पोस्ट केला होता. तेव्हाच तिला नेटिझन्सनी बऱ्याच शुभेच्छा दिल्या होत्या.

मध्यंतरी राहुल महाजन त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळे खुप चर्चेत होता. त्याची एक्स-वाईफ डिंपी गांगुली ही पुन्हा एकदा चर्चेत आलीय. ते म्हणजे तिच्या दुसऱ्यांदा आई बनल्याच्या निमित्ताने. तिने शनिवारी तिच्या बाळाला जन्म दिला. तिने बाळाच्या पायाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा फोटो व्हायरल झाला असून तिला नेटिझन्स शुभेच्छा देत आहेत. तिने फोटोला कॅप्शन दिले आहे की,‘आमच्या घरी नवा पाहुणा आला.’

डिंपीने इन्स्टाग्रामवर बाळाचा फोटो शेअर केला आणि लिहिले की,‘ईस्टरच्या दिवशी आर्यन रॉयचा जन्म झाला आहे. तिने तिची ही आनंदाची बातमी तिच्या मित्रमंडळींसोबत शेअर केली आहे. बिग बॉस ८ची स्पर्धक डिंपीचा आनंद अक्षरश: गगनात मावेनासा  झाला आहे. 

डिंपीने मागील डिसेंबरमध्ये सोशल मीडियावर ती प्रेगनंट असल्याचे सांगितले होते. तिने तिचा बेबी फ्लांट करतानाचा फोटो पोस्ट केला होता. तेव्हाच तिला नेटिझन्सनी बऱ्याच शुभेच्छा दिल्या होत्या.

टॅग्स :राहुल महाजन