गेल्या १५ एप्रिलला दिलीप कुमार यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याच्या कारणावरून रुग्णालयात भरती करण्यात आले होते. पण, आता दिलीप कुमारांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा आहे. भेटायला येणाऱ्यांना ते प्रतिसाद देत आहेत. अभिनेता आमीर खान दिलीप कुमार यांच्या भेटीला रुग्णालयात पोहोचला. आमीरला पाहून दिलीप कुमार यांना अतिशय आनंद झाला. म्हणूनच त्यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग साइटवर आमीर व त्यांचा एक फोटोही शेअर केला. अल्लाहच्या कृपेने आणि तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांनी मला बरे केले आहे. आमीर माझ्यासोबत वेळ घालवल्याबद्दल धन्यवाद. असा मेसेजही त्यांनी या फोटोखाली लिहिला आहे.
आमीरला पाहून सुखावले दिलीप कुमार
By admin | Updated: April 22, 2016 01:38 IST