Join us

‘लॉस्ट अँड फाउंड’ चे स्वप्निलने केले कौतुक

By admin | Updated: July 25, 2016 03:19 IST

आयुष्यात खूप धावपळ, गर्दी, माणसं, गोष्टी, टेक्नॉलॉजी, सोयी-सुविधा पण तरीही माणूस कोठे तरी जास्तीत जास्त एकटा पडत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे

आयुष्यात खूप धावपळ, गर्दी, माणसं, गोष्टी, टेक्नॉलॉजी, सोयी-सुविधा पण तरीही माणूस कोठे तरी जास्तीत जास्त एकटा पडत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्याचबरोबर नवे तंत्रज्ञान, नवीन सोशल वेबसाईटस् या गोष्टींचा फायदा जरी होत असला तरी नुकसानदेखील होत असल्याचे अभिनेता स्वप्नील जोशी याने सोशल मीडियावर अपडेट केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. स्वप्नील म्हणाला, एकटेपणा या गोष्टीला प्रत्येक व्यक्तीला तोंड द्यावे लागते. मलाही या एकटेपणाला तोंड द्यावे लागले आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. माझ्या आयुष्यात खूप एकटेपणा जाणवत होता. ही गोष्ट व्यावसायिकतेशी संबंधित नसून वैयक्तिक जीवनाशी होती. त्या वेळी माझा आत्मविश्वास पूर्णपणे डगमगला होता. तेव्हा फॅमिली व मित्रांनी माझ्याशी बोलून माझा हा एकटेपणा दूर करण्यास खूप मदत केली. याच एकटेपणावर आधारित असलेला लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड हा चित्रपट आहे. या चित्रपटात सुंदर कल्पना, कास्ट, टेक्निशियन्स जोडले गेले आहेत. त्यामुळे हा चित्रपट तुमच्यातला एकटेपणा दूर करण्यास नक्कीच मदत करेल. त्याचबरोबर जगण्यासदेखील प्रेरणा देणारा लास्ट अ‍ॅण्ड फाऊंड हा चित्रपट नक्कीच पाहा.