Join us

‘ड्रीम कम ट्रू’

By admin | Updated: September 5, 2016 02:25 IST

एखाद्या मोठ्या शहरात आपले घर असावे, असे अनेकांचे स्वप्न असते;

एखाद्या मोठ्या शहरात आपले घर असावे, असे अनेकांचे स्वप्न असते; पण आयुष्यभर मेहनत करूनही अनेकांना हे स्वप्न पूर्ण करणे शक्य होत नाही; पण अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने अवघ्या वयाच्या २५व्या वर्षी एका महानगरात आपले मोठे घर घेतले आहे. सिद्धार्थ चांदेकर हा लहानाचा मोठा पुण्यात झाला. पुणे शहराविषयी असलेल्या त्याच्या प्रेमामुळे त्याने आपल्या कमाईचे पहिले घर पुण्यातच घेतले. हे घर अतिशय मोठे तर आहेच, त्याचबरोबर घराचे इंटेरियरही खूप छान करण्यात आलेय. याविषयी सिद्धार्थ सांगतो, माझे हे स्वप्न होते की, वयाची २५शी पूर्ण होईपर्यत माझे स्वत:चे घर घ्यायचे. आज माझे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यामुळे मी प्रचंड आनंदित आहे. या घरातील इंटेरियर मी खूप वेगळ्या पद्धतीने केले आहे. तसेच, इंटीरियरमध्ये मॉडर्न गोष्टींचा वापर न करता मी अँटिक गोष्टींना प्राधान्य दिले आहे. मी माझे संपूर्ण घर हे विविध अँटिक गोष्टींनी सजविले आहे.