'गीत: हुई सबसे परायी', 'दिल मिल गये', 'मधुबाला' या मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री दृष्टी धामीने गेल्या वर्षी गोंडस मुलीला जन्म दिला. काही काळापासून ती स्क्रीनवरुन गायब आहे. लेकीचा सांभाळ करण्यात ती व्यग्र आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दृष्टीने लेकीचा चेहरा रिव्हील केला आहे. तसंच तिचं नावही सांगितलं आहे. चिमुकलीला पाहून दृष्टीचे चाहते खूश झाले आहेत.
दृष्टी धामी आणि पती नीरज खेमका यांनी लेकीच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो पोस्ट केले आहेत. लीला खेमका असं तिचं नावही तिने रिव्हील केलं. २२ ऑक्टोबर रोजी त्यांची मुलगी १ वर्षाची झाली. लव्हेंडर रंगाच्या थीममध्ये सगळं डेकोरेशन करण्यात आलं होतं. लीलाला छानसा लव्हेंडर रंगाचा फ्रॉक, मॅचिंग हेअर बेल्ट घातला होता. सोबत पहिल्या वाढदिवसाचा केकही होता.
दृष्टीच्या या फोटोंवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. छोट्या लीलावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. दृष्टी धामीने २१ फेब्रुवारी २०१५ रोजी बिझनेसमन नीरज खेमकासोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर ९ वर्षांनी त्यांना मुलगी झाली. दृष्टी अनेकदा लेकीसोबतचे व्हिडीओ शेअर करत असते. आई झाल्यानंतर ती आणखी जास्त जागरुक झाली आहे. पहिल्यांदाच तिने सोशल मीडियावर लेकीचा चेहरा दाखवला आहे.
Web Summary : Actress Drashti Dhami, known for 'Madhubala,' revealed her daughter Leela's face on her first birthday. Drashti and her husband, Neeraj Khemka, celebrated with a lavender-themed party, sharing adorable photos and videos with fans. The couple married in 2015 and welcomed their daughter nine years later.
Web Summary : 'मधुबाला' के लिए जानी जाने वाली अभिनेत्री दृष्टि धामी ने अपनी बेटी लीला का चेहरा उसके पहले जन्मदिन पर दिखाया। दृष्टि और उनके पति, नीरज खेमका ने लैवेंडर-थीम वाली पार्टी के साथ जश्न मनाया, और प्रशंसकों के साथ मनमोहक तस्वीरें और वीडियो साझा किए। इस जोड़े ने 2015 में शादी की और नौ साल बाद अपनी बेटी का स्वागत किया।