Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘तनू’च्या सिक्वलमध्ये कंगनाचा डबल रोल

By admin | Updated: October 13, 2014 03:19 IST

‘तनू वेड्स मनू’ या चित्रपटाच्या सिक्वलची शूटिंग लवकरच सुरू करण्याचा निर्माता आनंद रायचा मानस आहे. आर. माधवन, जिमी शेरगील आणि कंगना राणावत हे सिक्वलमध्ये आहेत.

‘तनू वेड्स मनू’ या चित्रपटाच्या सिक्वलची शूटिंग लवकरच सुरू करण्याचा निर्माता आनंद रायचा मानस आहे. आर. माधवन, जिमी शेरगील आणि कंगना राणावत हे सिक्वलमध्ये आहेत. या चित्रपटात कंगनाही आपल्या कारकीर्दीत पहिल्यांदाच ‘डबल रोल’ साकारणार आहे. तनू आणि मनू यांचे लग्न झाले आहे. तनूची ‘हमशकल’ एक अ‍ॅथलिट असते. त्यामुळे दोघांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येतात, अशी या चित्रपटाची कथा असल्याचे सूत्राने सांगितले. हा कंगनाच्या कारकीर्दीतील चांगला चित्रपट समजला जातो.