Join us

दार उघड बये, दार उघड!

By admin | Updated: May 14, 2016 00:44 IST

दार उघड बये, दार उघड! असे म्हणत आज संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेला चेहरा म्हणजे आदेश बांदेकर. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे आज सर्वांचे लाडके भाऊजी असलेले आदेश बांदेकर

दार उघड बये, दार उघड! असे म्हणत आज संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेला चेहरा म्हणजे आदेश बांदेकर. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे आज सर्वांचे लाडके भाऊजी असलेले आदेश बांदेकर ‘लोकमत’च्या कार्यक्रमामध्ये सर्व सख्यांसोबत खेळ खेळायला सज्ज झाले होते. त्यांच्या एकंदरीतच या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आणि महिलांकडून मिळणाऱ्या प्रेमाविषयी त्यांनी खास ‘लोकमत सीएनएक्स’कडे मनमोकळ्या गप्पांमधून अनेक गोष्टींचा उलगडा केला. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे तुम्ही आज संपूर्ण महाराष्ट्राचे भाऊजी झाला आहात, याबद्दल काय सांगाल?ल्ल होम मिनिस्टर हा कार्यक्रम मी गेल्या १२ वर्षांपासून करीत आहे. मला संपूर्ण महाराष्ट्रातून अगदी सुरुवातीपासूनच अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जेव्हा एखाद्या वहिनीच्या घरी खेळ खेळण्यासाठी जातो अन् ती भाऊजी म्हणते तेव्हा खरंच छान वाटतं. आज या कार्यक्रमामुळे मी या माउलींचा भाऊजी होऊ शकलो, ही माझ्यासाठी खरंच आनंदाची बाब आहे. वहिनींकडे लक्ष देताना कधी बायकोच्या रोषाचा सामना करावा लागतो का?ल्ल मी माझ्या कामाचे नियोजन अगदी व्यवस्थितपणे करतो आणि सुचित्रादेखील मला समजून घेते; त्यामुळे राग, रोष अशा गोष्टी कधीच होत नाहीत. आजवर माझ्या बायकोने मला खूप साथ दिली आहे, मला समजून घेतले आहे. मीसुद्धा तिला वेळ देण्याचा प्रयत्न करतो. परंतु तिची कधीच कोणतीच तक्रार माझ्याकडे नसते. तुम्ही सतत एवढ्या महिलांमध्ये काम करत असता तेव्ही तुमच्या बायकोची रिअ‍ॅक्शन काय असते, त्यांना कुठेतरी इनसिक्युरिटी नाही वाटत का?ल्ल सुचित्रा म्हणते माझ्या नवऱ्यावर एवढ्या साऱ्या बायका प्रेम करतात यासारखा दुसरा आनंद मला नाही. माझा नवरा सर्वांत सुरक्षित आहे. ती कधीच इनसिक्युअर नसते. खरंतर तुम्हाला समोरच्याच्या नजरेला नजर देऊन बोलता आले पाहिजे. तुमच्या नजरेत स्वच्छ अन् प्रामाणिक, निर्मळ भाव असायला पाहिजे म्हणजे झालं. महिलांसोबत काम करताना तुम्ही फारच अ‍ॅक्टिव्ह दिसता, तुमच्या या एनर्जीचे राज काय आहे?ल्ल खरंतर काहीच नाही. मी फक्त हे माझे काम आहे अन् ते करायचे आहे एवढंच डोक्यात ठेवतो. माझ्या माउली सकाळी उठल्यापासून काम करीत असतात. सकाळी घरच्यांचा डबा, मुलांचे खाणे-पिणे, रात्रीचे जेवण या सगळ्या गोष्टी करून त्या उत्साहाने खेळ खेळण्यास उभ्या राहतात. मग मला अशा या माझ्या माउलींकडे पाहूनच एनर्जी मिळते. लोकांचे खूप आशीर्वाद आहेतच आणि म्हणूनच मी त्यांच्या प्रेमाखातर इथे उभा आहे.