Join us
Daily Top 2Weekly Top 5

डॉनच्या रिलीजला ३८ वर्षे पूर्ण, बिग बींनी चाहत्यांसोबत शेअर केल्या आठवणी

By admin | Updated: May 12, 2016 06:20 IST

३८ वर्षांपूर्वी २० एप्रिल रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल झाला होता. ट्विटरवर #38YearsOfDON ट्रेंड सध्या सुरु आहे. चाहत्याकडून अमिताभ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.

नामदेव कुंभार
मुंबई, दि. १२ : बॉलिवूडचे महानायक सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा 'डॉन' हा सिनेमा तुम्ही बघितला असेलच. या सिनेमातील डायलॉग्स लोकांच्या ओठी आजही रेंगाळत आहेत. या सिनेमातील डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है। हा संवाद आजही तेवढाच प्रसिद्ध आहे. 'डॉन'चा उल्लेख करण्याचे विशेष कारण म्हणजे या सिनेमाला रिलीज होऊन तब्बल ३८ वर्षे पूर्ण झाली आहेत. ३८ वर्षांपूर्वी २० एप्रिल रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये दाखल झाला होता. ट्विटरवर #38YearsOfDON ट्रेंड सध्या सुरु आहे. चाहत्याकडून अमिताभ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. 
सिनेमाच्या या प्रवासाला उजाळा देताना बिग बींनी सिनेमाशी निगडीत काही इंट्रेस्टिंग गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. ट्विटरवर बिग बी म्हणाले, " आज डॉन ३८ वर्षांचा झाला. असामान्य! एक प्रवास जो आजही सुरु आहे." एक जेंटल सिनेमॅटोग्राफर नरिमन इरानी यांनी तयार केलेला सिनेमा." 
 
चंद्रा बरोट दिग्दर्शिक अ‍ॅक्शन थ्रीलर हा सिनेमा १९७८ मध्ये रिलीज झाला होता. सिनेमात बिग बींसह झीनत अमान, प्राण, इफ्तेखार यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. सलीम-जावेद यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली होती, तर कल्याणजी-आनंदजी यांचे संगीत होते. सिनेमात बिग बींनी दुहेरी भूमिका साकारली होती.